Javascript DHTML Drop Down Menu Powered by dhtml-menu-builder.com  

गुरुपंचायतन संस्थान ( श्री स्वामी समर्थ संप्रदाय ) । स्वामी समर्थ जयंती ( चैत्र शुद्ध  दवितीया ) ।  हनुमान जयंती ( मारुती मंदिर वर्धापन दिन - चैत्र शुद्ध पौर्णिमा )  । चंदन उटी सोहळा ( चैत्र शुद्ध द्वितीया ते अक्षय तृतीया )  ।  वैशाख शुद्ध पौर्णिमा ( बौद्ध पौर्णिमा ते व्यास पौर्णिमा ) गुरु पौर्णिमा ( आषाढ शुद्ध पौर्णिमा )  । गंगा दशहरा ( जेष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी )  ।  निर्जला एकादशी ( जेष्ठ शुद्ध एकादशी )  ।  श्री गुरु द्वादशी ( अश्विन कृष्ण द्वादशी )  ।  अयाचित वृत्ती पदयात्रा ( भाऊबीज ते त्रिपुरारी पर्णिमा )।  श्री दत्त जयंती ( मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा )  ।  गुरु प्रतिपदा ( माघ वद्य प्रतिपदा ) ।  गुरुपंचायतन   वर्धापन दिन ( २५ व २६ मार्च २०१६ )  फाल्गुन कृष्ण द्वितीया व तृतीया ।  गुरुपीठ वर्धापन दिन ( माघ शुद्ध त्रयोदशी )  ( चैत्र शुद्ध द्वितीया )  ।  

 
 

||  स्वामीसखा ||

 

श्री  स्वामी समर्थांचा कृपाप्रसाद म्हणून चार तांदळाचे दाणे व दोन घोंगडीच्या दशा घराण्यातील एका पूर्वजास मिळाल्या होत्या. देवधर्म हा नुसता कर्मठपणा नन त्याला भक्तीची जोड असणा-या वाडवडिलांकडून भक्तीचा वारसा व वारंवार घडणारा संत सहवास, अशी पूर्वसुकृताची जोड आठल्ये घराण्याला मिळाली होती. अशा अध्यात्मिक घराण्यात स्वामी सखा यांचा जन्म १९५५ साली २४ जानेवारीस दु. २ वा. ईश्वरपूर येथे झाला.

लहानपणापासूनच स्वामी सखा यांना वडीलांकडून गुरुभक्तीचा वारसा मिळाला. १९२३ पासून आठल्ये कुटुंबीयांतर्फे ईस्लामपूर येथे दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्याप्रमाणे स्वामी सखा यांनी ही परंपरा समर्थवाडीत चालू ठेवली आहे.
 

 वडीलांचे सर्व गुण (मूर्तीकला, रांगोळी, गायन व वादन) त्यांनी आत्मसात केले. अतिशय बिकट परिस्थितीत त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले. याच दरम्यान त्यांना श्री धोंडीबा मुधाळे, स्वामी स्वरुपानंद्, भालचंद्र महाराज यांचा सहवास १-२ वर्षे लाभला. १९७४ ते १९७६ दरम्यान स्वामी सखा कोल्हापूर येथे उच्च शिक्षण घेत असतांना त्यांचा संबंध चिले महाराजांशी आला. त्यावेळी नाना कोतेकर हे कोल्हापूरात कसबा पेठ येथे रहात होते. चिले महाराजांनी घेतलेल्या सर्व कसोट्यांना पूर्णपणे खरे उतरल्याने महाराजांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली.

वडीलांच्या मृत्युनंतर त्यांनी ईश्वरपूर सोडून पुण्यातील शंकर महाराजांच्या मठात काही काळ काढला. १९७९ च्या सुमारास ते ठाण्यास आले. येथे रांगोळी प्रदर्शन भरवून त्यांनी चरितार्थ चालविला. त्यानंतर नेरळ येथे रहावयास गेले. स्वप्नात झालेल्या दृष्टांतानुसार पेब किल्ल्याचा विकास केला. गडावर शिवरात्र, होळी सारखे सण व अध्यात्मिक शिबीरे आयोजित करण्यात येतात. आता येथे प्रति गिरनारची स्थापना करण्यात आली आहे.
 
१९८१ मध्ये स्वामी सखा यांना आय टी आय मध्ये नोकरी मिळाली व त्यामुळेच त्यांना 'सर्' हे नाव रुढ़ झाले. १९८३ साली त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी सौ. विद्याताई (विद्युलता विनायक रीसबुड, कल्याण. मूळचे दापोली, जि. रत्नागिरी) यांनी संसार तर केलाच पण त्याबरोबर स्वामींना अध्यात्मिक साथही दिली. त्यांच्या या सहकार्यामुळेच 'समर्थवाडी' हे वटवृक्ष उमलले.
 
भौगोलिक दृष्ट्या समर्थवाडीत बांधकाम करणे कठीणच तरीही वाडीतील मंदिरांव्यतिरीक्त धरण व पाण्याच्या टाक्या बांधल्या. समर्थवाडीचे हे कार्य केवळ दिव्य व अतुलनीय आहे. श्री स्वामी सखा यांनी जवळ एकही पैसा न घेता अयाचित वृत्तीने १८,००० किमी पायी प्रवास केला. यामध्ये अक्कलकोट पदयात्रा, कृष्णा परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, अष्टविनायक, गिरनार परिक्रमा, जगन्नाथपुरी अशा काही महत्वाच्या प्रदक्षिणा आहेत. तसेच चारधाम यात्रा, कैलास मानसरोवर, नवदत्तधाम, अंदमान निकोबार अशा काही अध्यात्मिक सहलीही काढल्या. हे सर्व अफाट कार्य करत असतांना महाराष्ट्रभर प्रवचने, अध्यात्मिक कार्यक्रम करुन स्वामीभक्तांना योग्य ते मार्गदर्शन केले. सावरगाव, ईस्लामपूर, लोणावळा येथे जाऊन तेथील मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अक्कलकोट येथे महाराजांच्या समाधीवर ११ किलो चांदीचे आवरण घातले तसेच श्री राजेराय मठात व हक्याच्या मारुतीला चांदीचा मुकुट भेट दिला. अक्क्लकोट येथील अन्नछत्र मंडळाला भेट दिलेली चांदीची पालखी आज महाराष्ट्रभर फिरत आहे.
अध्यात्माबरोबरच शेतीचीही आवड असल्याने ईस्लामपूर जवळील रेठरेधरण येथे अवघ्या अडीच एकर मध्ये जणू काही स्वर्गाची निर्मिती केली आहे.


Home | Samarthawadi | Swamisakha | Audio Collection | Book Collection | Video Collection | Gallery | Download Brochure Contact Us

SWAMISAKHA
( Shri Samartha Sampraday Wadi )

Badlapur Neral Road, Kasgaon, Badlapur,
Tel. : 8698 794 552

Devnagari
Pradyumna Athlaye (9960376746)
( Time : 9.00 AM to 5.30 PM )