Javascript DHTML Drop Down Menu Powered by dhtml-menu-builder.com  

गुरुपंचायतन संस्थान ( श्री स्वामी समर्थ संप्रदाय ) । स्वामी समर्थ जयंती ( चैत्र शुद्ध  द्वितीया ) ।  हनुमान जयंती ( मारुती मंदिर वर्धापन दिन - चैत्र शुद्ध पौर्णिमा )  । चंदन उटी सोहळा ( चैत्र शुद्ध द्वितीया ते अक्षय तृतीया )  ।  वैशाख शुद्ध पौर्णिमा ( बौद्ध पौर्णिमा ते व्यास पौर्णिमा ) गुरु पौर्णिमा ( आषाढ शुद्ध पौर्णिमा )  । गंगा दशहरा ( जेष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी )  ।  निर्जला एकादशी ( जेष्ठ शुद्ध एकादशी )  ।  श्री गुरु द्वादशी ( अश्विन कृष्ण द्वादशी )  ।  अयाचित वृत्ती पदयात्रा ( भाऊबीज ते त्रिपुरारी पर्णिमा )।  श्री दत्त जयंती ( मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा )  ।  गुरु प्रतिपदा ( माघ वद्य प्रतिपदा ) ।  गुरुपंचायतन   वर्धापन दिन ( २५ व २६ मार्च २०१६ )  फाल्गुन कृष्ण द्वितीया व तृतीया ।  गुरुपीठ वर्धापन दिन ( माघ शुद्ध त्रयोदशी )  ( चैत्र शुद्ध द्वितीया )  ।

 
 

|| समर्थवाडी ||

 

सुख़समाधानासाठी, आनंदासाठी आपन प्रपंचाचा अंगिकार करतो. पण अशा व्यवहारातुन मिळणारे सुख क्षणभंगुर असते. कदाचित या क्षणभंगुर आनंदापासुन अनंतकॉटी समाधान साधण्यासाठी अध्यात्माची गरज या कलियुगात आहे. अशी प्रपंच व अध्यात्माची सांगड केवळ संत सत्पुरूषच घालु शकतात. ज्या प्रकारे संत अरण्यात, डोंगरात, कडेकपारीत राहुन, तप करून परमेश्वर प्राप्त करून घेतात, त्या प्रमाणे साधना उपासना, जप तप अथवा व्रत हे असे एकांत वनश्रींच्या, पशु पक्षांच्या सानिध्यात राहुन केल्यास परमेश्वर प्राप्त करून घेता येतो.

श्री समर्थवाडी हे विष्णु पंचायतनाचे स्वरुप असून येथे मारुती मंदिर, गायत्री मंदिर, शनि मंदिर, शिव मंदिर, सूर्य मंदिर, दत्त मंदिर, देवीचे स्थान, रुद्रभूमी, पादुका मंदिर, स्वामीगंगा, शैल्यमंदिर अशी प्रतीके उभारण्यात आली आहेत. २७ नक्षत्रे व १२ राशींचे वृक्ष लावण्यात आले आहेत. याखाली बसून कोणत्याही पंथाची व्यक्ती, येथील नियम पाळून त्या त्या शक्तीची आराधना, भक्ती करु शकते तसेच येथील ४ ध्यान गृहात बसून ध्यानधारणा करु शकते.

श्री समर्थवाडीत विविध प्रकारच्या पशु पक्ष्यांचे संगोपन करण्यात आले आहे.
श्री समर्थ वाडी येथे अवघ्या ६ एकरच्या नापीक परिसरात वातावरणातील प्रदूषणातील प्रदूषण लक्षात घेवुन ७२००० औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. वाडीत नित्यनियमितपणे अग्निहोत्र, याग, यज्ञ आणि होम संपन्न होतात. यामुळे वातावरणातील संतुलन राखण्यास मदत झाली आहे.
श्री स्वामी समर्थ या संस्थेने जवळच वाहणा-या ओढ़्यात धरण बांधुन शासनाच्या कार्यक्रमानुसार 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा प्रकल्प ६०००० घनलिटर क्षमतेचा राबविला आहे. त्यामुळे आसपासचे ७/८ किलोमीटरचे क्षेत्र हिरवेगार दिसते. तसेच सौर उर्जा, सौर चूल व पवनचक्की यासारखे प्रकल्प कार्यान्वित केले आहे.
अशा या अदभुत, अध्यात्मिक व विज्ञानयुक्त स्थानाची निर्मिती, पंचम गुरुपिठाधीश श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती उर्फ आठल्ये सर यांनी १५ एप्रिल १९९४ या शुभदिवशी दु. २ वा. केली.
 


Home | Samarthawadi | Swamisakha | Audio Collection | Book Collection | Video Collection | Gallery | Download Brochure Contact Us

 

SWAMISAKHA
( Shri Samartha Sampraday Wadi )

Badlapur Neral Road, Kasgaon, Badlapur,
Tel. : 8698 794 552

Devnagari
Pradyumna Athlaye (9960376746)
( Time : 9.00 AM to 5.30 PM )